अपंग दिव्यांगांचे बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या म्होरक्यासह पंटर अटकेत

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शासनाच्या वतीने राज्यातील अपंग व दिव्यांग नागरीकांना महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाच्या एस.टी. बसेसमध्ये प्रवास करण्यासाठी ( वन फोर ) म्हणजे काही प्रमाणात सुट मिळावी यासाठी ओळख पत्र देण्यात आलेले आहे. परंतु जामनेर शहरात नव्हे तर तालुक्यात असा जास्त रक्कम घेऊन बनावट ओळखपत्र बनवुन देण्याचा गोरख धंदा मोठया प्रमाणात सुरू असल्याची गुप्त माहिती जामनेर पोलीसांना मिळाली. कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अधिकार नसतांना किंवा  ते शासकीय नसतांना त्यांनी शासनाचे आर्थिक नुकसान व्हावे म्हणुन अपंग, व दिव्यांग नागरीकांचे राज्य परीवहन मंडळाचे बनावट ओळखपत्र बनवुन तो महसुल शासनाच्या तिजोरीत न जात असल्याने ती केवळ  शासनाची एक प्रकारे लुटच केली जात असुन या गोरख धंदयातुन लाखो रुपयाची माया पुंजी मिळत आहे.

कित्येकांनी आपले  उखळ पांढरे करून लाखो रुपयांची  मोठी मायापुंजी  जमा केली आहे. या अटकेमुळे शहरात खळबळ माजली आहे. अशा प्रकारच्या गोपनीय  माहितीच्या आधारे जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पो . नि . श्री .किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीसांनी एका डमी ग्राहकाच्या मार्फत पंटरा करवी बनावट ओळखपत्र बनविण्याचे  सांगण्यात आले.

सदर टोळीतील पंटर हा जामनेर नगर परीषदेजवळ ओळखपत्र घेऊन उभा राहिला पोलीसांकडुन योग्य प्रकारे सापळा रचण्यात आल्याने तो  पंटर अलगद पकडला गेला . शे .अब्दुल्ला शे. अमीन (रा. घरकुल. जामनेर) व गोपाल विनायक सोनार (रा. जामनेर पुरा) असे या आरोपींची नावे असुन या दोघांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून कागद पत्रांसह इतर मुद्देमाल व अपंग, दिव्यांगांचे  बनावट ओळखपत्र  हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींकडुन आणखी काही माहिती व  मासे गळाला लागण्याची माहिती शक्यता वर्तवली  जात आहे.  या दोन्ही आरोपींवर गुन्हा र . जि. नं ३३९ / २०२१ भा .द.वि. कलम ४२०, ४०० , ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ओळख पत्र टोळी पकडण्या कामी पथकामध्ये  सहाय्यक पो. नि. किशोर पाटील, योगेश महाजन, सुनिल माळी, रीयाज शेख, दिलीप वाघमोडे आदी यांनी मोलाची कामगीरी बजावली. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वांचे कौतुक केले जात आहे. पुढील तपास हा सहाय्यक पो. नि. किशोर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.