अनलॉक डाऊन काळात नियमांचे उल्लंघन ; दोन दुकाने सील

0

भुसावळ (प्रतिनिधी) : अनलॉकडाऊन काळात नियमांनुसार शासनाने काही दुकाने सुरु ठेवण्याकरीता आठवडयातील ठराविक दिवस व वार ठरवून दिले आहे. मात्र येथील दोघां दुकानदारांनी उपविभागीय अधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने गुरुवार १८ जून रोजी दुपारी पालिकेच्या पथकाने कारवाई केली असून दोन दुकाने सील केले आले.

कोरोनाचा वाढता फैलाव व बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी व्यावसायीकांना दुकाने उघडून द्यावयाचे दिवस ठरवून दिले आहेत शिवाय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे मात्र त्यानंतरही ठरवून दिलेल्या दिवशी दुकान न उघडता नियम मोडल्याने शहरातील जळगाव रोड वरील लक्ष्मी इंटरप्रायझेस, तसेच स्टेशनरोड वरील शिवाजी इंटरप्रायजेस ही दोन दुकाने उघडण्यात आली होती.

दरम्यान नियमांचे उल्लंघन केले म्हणून यां दोन्ही दुकानांना सील ठोकण्याची कारवाई गुरुवार रोजी प्रभारी मुख्याधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद पथकातील पंकज पन्हाळे, संजय बनाईते,सुरज नारखेडे, शे परवेज अहमद, विशाल पाटील, राजेश पाटील,पोलीस कर्मचारी दीपक शिंदे यांनी कारवाई केली. व्यावसायिकांनी नियमांचे पालन करा, पुढील आदेश येईपर्यंत आता व्यावसायीकांना दुकान उघडता येणार नाही शिवाय नियम मोडल्यास आणखी कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा सूत्रानी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.