अत्यल्प अनुदान देऊन शासनाकडून शेतकऱ्यांची क्रुर थट्टा – रुपाली चाकणकर

0

चाळीसगाव – ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना नुकसानीची झळ पोहोचली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे तालुक्यातील नगदी व खरीप पिकांची तसेच फळबागाची प्रचंड नासाडी झाली आहे.यात नुकसान भरपाई बाबत शासन मात्र हेतुपुरस्कर दिरंगाई करत असल्याची टिका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली.त्या आज राजगड येथील आयोजित बैठकीदरम्यान बोलत होत्यात.यावेळी माजी आमदार राजीव देशमुख,महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील,माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख,जि.प.गटनेते शशिकांत साळुंखे,जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील,तालुकाध्यक्षा सोनल साळुंखे आदी उपस्थित होतेत

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या गेल्या तीन दिवसापासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेत तालुक्यातील समस्या जाणून घेतली.परतीच्या पावसामुळे शेती पाण्यात गेलीत तर कापसाच्या बोंडातील सरकी तसेच मका आणि ज्वारीच्या कणसावर कोंब फुटले असून अनेक ठिकाणी फळबागांची नासाडी झाली आहे.खरीप हंगामात शेतीत टाकलेला उत्पादन खर्च व कापणीला आलेली पिके पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला गेला आहे.शासनाच्या वतीने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी रुपये ८ हजार इतकी तुटपुंजी मदत जाहीर केली असून तालुक्यात फळबागांसाठी अनुदान न देता पंचनामे देखील करण्यात आलेली नाहीत.एकप्रकारे शासनाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावली असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टिका करीत त्यांनी शासनावर निशाणा साधला.

कपाशी,सोयाबीन,मका,ज्वारी,बाजरी यासह भाजीपाला या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून असून नैसर्गिक आपत्तीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे.त्याचा फटका शहरी उद्योगांनासुद्धा बसला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नासाडीची शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने ठोस पाऊले उचलायला हवीत असे मत माजी आमदार राजीव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले

याप्रसंगी मंगला पाटील,मिनल पाटील,पंचायत समितीच्या माजी उपसभापती लता दौंड,माजी नगरसेविका प्रतिभा राजपूत,पं.स.गटनेते अजय पाटील,पं.स.सदस्य जिभाऊ पाटील,बाजीराव दौंड,भाऊसाहेब केदार,शिवाजी सोनवणे,शहराध्यक्ष शाम देशमुख,नगरसेवक रामचंद्र जाधव,भगवान पाटील,सदाशिव गवळी,दिपक पाटील,सूर्यकांत ठाकूर,शेखर देशमुख,योगेश पाटील,युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी,उपाध्यक्ष शुभम पवार,विद्यार्थी तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर,पिंप्रीचे माजी उपसरपंच राजेंद्र मोरे,कुशल देशमुख,सुजित पाटील,सौरभ त्रिभुवन,प्रताप भोसले,आकाश पोळ,अजय पाटील,हृदय देशमुख,कौस्तुभ राजपूत,दिपक शिंदे,विनोद चौधरी,पिनू सोनवणे,गुंजन मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.