अखेर मारहाण प्रकरणी शिरसाळा येथील पाच जणांवर गुन्हा दाखल

0

गेल्या आठवड्यात उत्तर क्रियेच्या दिवशी झाला होता वाद

बोदवड – तालुक्यातील शिरसाळा येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास शिरसाळा बस स्टँड वर येथील रहिवासी सुरेश नारायण कोळी आपल्या मित्रांसोबत उभे असताना गावातील राजेंद्र गोविंद पाटील यांच्यात धक्काबुक्की झाली असता राजेंद्र देविदास तायडे याला काहीएक कारण नसताना राजेंद्र गोविंदा पाटील,जितेंद्र रामदास पाटील,रघुनाथ पांडुरंग पाटील,गणेश विश्वनाथ पाटील, अमोल एकनाथ पाटील या पाच जणांनी लाकडी दांडा व लोखंडी रॉडने त्यांना जबर मारहाण केली.त्याला ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट केले होते.या मारहाणीमध्ये जखमी राजेंद्र यांच्या खिशातील मजुरीचे बाराशे पन्नास रुपये पडले आहे.

या प्रकरणी आरोपी जितेंद्र रामदास पाटील,राजेंद्र गोविंदा पाटील,रघुनाथ पांडुरंग पाटील,गणेश विश्वनाथ पाटील,अमोल एकनाथ पाटील यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या आदेशाने बोदवड पोलीस स्टेशनला भा.दं.वि.कलम 326,323,143,147, 148,149,504,व 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक श्री. भाईदास मालचे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.