अतिरेकी हल्ला, रायफल अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद

0

मणिपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेखन-बेहियांग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा हल्ला झाला. 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आपल्या कुटुंबासह क्यूआरटीमध्ये  जात होते. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला.

 

मिळालेल्या  माहितीनुसार, क्यूआरटीमध्ये तैनात कमांडिंग ऑफिसर आणि 7 सैनिकांसह  पत्नी आणि एका मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सध्या यासंदर्भात लष्कराकडून अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

मणिपूरचे मुख्यमंत्री नॉन्गथोम्बम बिरेन सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि असे भ्याड कृत्य सहन केलं जाणार नाही असे सांगितलं. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. हे अमानुष आणि दहशतवादी कृत्य असल्याचं ते म्हणाले. लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं की, ‘क्विक रिअ‍ॅक्शन टीमसोबत अधिकाऱ्याचे कुटुंबीयही ताफ्यात होते. जीवितहानी होण्याची भीती आहे. अजूनही मोहीम सुरूच आहे. अजून माहितीची वाट पाहत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.