अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकुलांना शासकीय जागा देण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर एन.डी.एम.जे संघटनेचे तीव्र आंदोलन

0

निष्क्रिय तहसीदारांना खुर्चीवरून खाली खेचण्याची ताकद आंबेडकरी चळवळीत आहे………वैभव गिते

अहमदपूर (प्रतिनिधी) : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टाइस या सामाजिक संघटनेमार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरवात झाली.पंढरपूर तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मांच्या गोरगरिबांना घरकुल मिळण्यासाठी सर्व घरकुल लाभार्थ्यांना गायरान गावठाण व अन्य प्रकारची शासनाच्या ताब्यात असलेली शासकीय जमीन घरकुल बांधण्यासाठी मिळावी म्हणून तसेच पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधील शासकीय जमिनींवरील निवासी अतिक्रमणे नियमित व नियमानुकूल करण्यासाठी निदर्शने करून तीव्र आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात राज्य समन्वयक रमाताई अहिरे व राज्य सचिव वैभव गिते यांच्या नेतृत्वात व राज्य सहसचिव पी.एस.खंदारे मराठवाडा उपाध्यक्ष संजय माकेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.धनाजी शिवपालक यांनी प्रास्ताविक करून पंढरपूर तालुक्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत भीषण परिस्थिती सर्व गावांमध्ये घरकुलांचा व घरकलांसाठी जागा नाही हा प्रश्न संबंध तालुक्याचा आहे हे जनतेसमोर मांडले रोहित एकमल्ली यांनी पंढरपूर प्रशासनास धारेवर धरून सर्व पाठपुरावा करून यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी घरकुलांना शासकीय जागा मिळण्याचा माळशिरस तालुक्याचा पॅटर्न महाराष्ट्रभर करणार असल्याचे सांगितले.बारामतीचे आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते महेंद्र गायकवाड सर यांनी शासनाच्या धोरणांवर कडाडून टीका करत हे आंदोलन महाराष्ट्रभर करण्याचा संकल्प केला.रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते ऍड.किर्तीपाल सर्वगुड व बहुजन समाज पार्टीचे मंगळवेढा महासचिव येताळा खरबडे,पंचायत समिती सदस्य देवकुळे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.आंदोलनाला वाढता प्रतिसाद पाहता तहसीलदार पंढरपूर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तात्काळ आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले तहसीलदार यांना निवेदन सादर केले.महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.निवेदनात
सन 2020-21 या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी च्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत “महा आवास अभियान ग्रामीण” राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,आवास योजना पारधी आवास योजना,आदिम आवास योजना,अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व इतर या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करनेसंदर्भात ज्या शासकीय,गावठाण, गायरान,शेती महामंडळ, व इतर जागेतील जागा व घरे नियमाकुल करण्याच्या संदर्भात तालुका प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे पाऊल अथवा कार्यवाही केली नाही त्यामुळे शासन निर्णयांची व शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे अनेक जाती धर्मातील गोरगरीब घरकुल लाभार्थी हक्काच्या घरापासून व जागा व घरे नियमानूकुल होण्यापासून वंचित आहेत.
पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे 2011 पूर्वीपासून शासकीय जागेत राहणाऱ्या लोकांच्या नोंदी नमुना नंबर आठ ला नोंदी घेतलेल्या नाहीत.ग्रामसेवकांनी आर्थिक तडजोडी करून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे व चुकीची दिशाभूल करणारा अहवाल ऑनलाईन पंचायत समितीस व तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयास पाठवला आहे.नव्याने तालुक्यातील सर्व गावांचा फेरसर्वे करावा.सर्व नोंदी कायदेशीर घेण्यात याव्यात.कुणावरही अन्याय होणार नाही कोणीही या सर्व लाभांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. व गटविकास अधिकारी पंचायत समिती,अधीक्षक भूमिअभिलेख,तलाठी,ग्रामसेवक,मंडल अधिकारी, यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी.

तरी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास (VB )योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास ग्रामीण राबवून सर्व शासकीय जागेतील अतिक्रमणे नियमानुकूल न केल्याने व घरकुल साठी शासकीय जागा न दिल्याने पंढरपूर जि.सोलापूर या तहसील कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजी मोर्चा व तीव्र आंदोलन व निदर्शने केली आहेत.

यावेळी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र चे राज्यसचिव वैभवजी गीते, राज्य समन्वयक रमाताई आहिरे, राज्य सहसचिव पी.एस.खंदारे, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे, मराठवाडा उपाध्यक्ष संजय माकेगावकर,आंबेडकर चळवळी चे जेष्ट नेते महेंद्र गायकवाड सर,एन डी एम जे चे राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे,एन डी एम जे चे जिल्हाअध्यक्ष पंकज काटे, उपअध्यक्ष धनाजी शिवपालक, तालुका अध्यक्ष सागर शिंदे ,एन डी एम जे चे इंदापूर ता.अध्यक्ष वैभव धाइंजे,बसपाचे वेताळ खरबडे,गोविंद सावंत, लखन सावंत,ऍड.किर्तीपाल सर्वगोड,बबन नवगिरे,नवनाथ गेजगे,रोहित साळे, पांडुरंग खिलारे,दिवानजी साठे, आदिंची उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.