अज्ञात वाहनाच्या धडकेत शेवाळे येथील तरुणाचा मृत्यू

0

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाडीजवळील शेवाळे येथील ३० वर्षीय अविवाहित तरुणास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल स्वार युवक फुटबॉल सारखा २० फुट उंच उडाला होता. त्यात त्याचा उजवा हात तुटून डोक्याला जबरी मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळावरून वाहन धारक युवकास उडवून फरार झाला. याप्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्री खु” ता. पाचोरा येथे दि. २१ रोजी सालाबादा प्रमाणे गैबनशा बाबा यात्रेनिमित्त शालीकराम शांताराम रोहिनीकर यांचा तमाशाचे आयोजन करण्यात आले असल्याने शेवाळे (वाडी) येथील संजय देवचंद वाघ (वय ३० वर्षे) हा तरुण आपल्या टी.व्ही.एस मोटरसायकल (क्रमांक – एम. एच. १९ – सी.एच. ३३९२) वर रात्री ११:३० वाजेच्या दरम्यान तमाशा पाहण्यासाठी जात होता. येथील भगवान बापूराव पांडे यांचे सार्वे – पिंप्री मध्यम प्रकल्पाजवळ मागवून येणाऱ्या अज्ञात वाहनाने संजय वाघ याचे मोटारसायकला जोरदार धक्का दिला. त्यात मोटारसायकल स्वार सुमारे २० फुट उंच उडाला काहीतरी जोरदार आवाज झाला असे ऐकल्या नंतर भगवान पांडे यांचे शेतात रोडनजीक राहत असलेल्या कामगार बाहेर येवून पाहिले तर अज्ञात वाहन पसार झाले होते. तर संजय वाघ हा रक्तबंबाळ होवुन मृत अवस्थेत पडला होता. कामगाराने तातडीने गावात येवून घटनेची माहिती वाघ यांचे कुटुंबास दिली. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार दिलीप पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.