अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ‘कोरोना’ची लागण

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ‘कोरोना’ची लागण

इस्लामाबाद : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे वृत्त आहे. दाऊदसोबतच त्याची पत्नी मेहजबीन  हिला देखील ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन केले आहेत आहे. दाऊदला आणि त्याच्या पत्नीला  कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

पाकिस्तानमधील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले जात आहे. दाऊद आपल्या देशात नसल्याचं सांगत पाकिस्तानने अनेक वेळा हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कराचीमध्ये त्याच्यावर उपचार होत असल्याचे वृत्त खरे ठरल्यास पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस येईल. दरम्यान, दाऊद इब्राहिमच्या घरी आता कोरोना विषाणू दाखल झाला आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दाऊद इब्राहिम आणि पत्नी महजबीन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून  त्याच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचा उल्लेख आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.

Comments are closed.