Monday, September 26, 2022

५० हजारासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा पिराचे येथील विवाहितेस मुलगा होत नाही तसेच  झालेल्या मुलीच्या बाळांतपणासाठी लागलेला ५० हजार रुपये आणावे या मागणीसाठी नगरदेवळा ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने पतीसह आठ जणांवर पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद पाटील हे करीत आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

नगरदेवळा येथील माहेर असलेल्या खैरुनिसाबी शेख इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब हिचा विवाह दि. २७ डिसेंबर २०१८ रोजी बोरखेडा (पिराचे) ता. चाळीसगाव येथील शेख इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब यांचेशी झाला होता. सासरे व पती हे गुराढोरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने पती अनेकदा बाहेरगावी असतात.

विवाहानंतर सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर सतत टोचुन बोलणे व शिवीगाळ करणे असला प्रकार सुरू झाला. २०१९ मधे मुलगी झाली या बाळांतपणासाठी ५० हजार रुपये माहेरुन आणावे या मागणीसाठी तिला मारहाण व शिवीगाळ झाल्याने शेख इस्माईल उर्फ भुरा शेख अयुब (पती), शेख अयुब शेख सरदार (सासरे), कुर्शादबी शेख अयुब (सासु), इसा शेख अयुब (जेठ), नफिसाबी शेख इस्माईल (जेठाणी), जरीनाबी शेख अयुब (ननंद) व जमिलाबी शेख अयुब रा. सर्व बोरखेडा (पिराचे) ता. चाळीसगाव यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद पाटील हे करत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या