शतकपूर्तीकडे वाटचाल करणारी भुसावळातील संत पॉल अँगलीकन चर्च (सी एन आय )

0
*भुसावळ (उज्वला बागुल)*
शहरातील लिम्पस क्लब भागात सुरु झालेल्या संत पॉल अँगलीकन चर्च (सी एन आय ) ला जवळपास ९३ वर्ष झाले असून  ही चर्च शतकाकडे वाटचाल करीत आहे व लवकरच सुवर्णमहोत्सव साजरा करणार असल्याची माहिती चर्च चे प्रिस्ट इन चार्ज रेव्ह किशोर अशोक गायकवाड व सहकार्यानी दिली . सन १९२७ मध्ये संत पॉल चर्च , भुसावळ मराठवाडा धर्मप्रांत (सी एन आय ) अँगलीकन चर्च हीची स्थापना रेव्ह . ……व  ख्रिश्चन बांधवानी पुढाकार घेवून स्थापन केली . दरम्यान काही वर्षानंतर     पुन्हा चर्चचे स्थलांतरण करण्यात आले .यावेळेस चर्च करिता इंग्लडची राणी व्हीक्टोरिया यांच्या पर्सनल निधी मधून निधी प्राप्त झाला आणि या निधितुन पॉल चर्च , कब्रस्थान च्या निर्मितीसह 187 चार्पलेन बंगलोंजची निर्मिती करण्यात आली . एकेकाळी
नाशिक डायसेस चा भाग असलेल्या या चर्चचा सन १९   मध्ये  मराठवाडा डायसेस मध्ये सहभाग झाला . सन १९२७ पासून आजपावेतो जवळपास १७ फादर यांनी अहोरात्र कार्य करून सेवा दिली तर सध्या चर्चची धुरा   रेव्ह . किशोर गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे  सहकारी यांनी यशस्वीरित्या सांभाळली  आहे
*नित्य दैनंदिन विविध धार्मिक व सेवाभावी उपक्रम*
या चर्चच्या माध्यमातून दर रविवारी ‘संडे स्कूल’ च्या अंतर्गत लहान मुलांना प्रार्थना यासह शैक्षणिक शिक्षण दिले जाते . दर शुक्रवार रोजी महिला मंडळातर्फे सभा, प्रार्थना घेण्यात येते . तसेच आजारी रुग्नांना भेटुन त्यांची विचारपुस करून रुग्नांची सेवा केली जाऊन आरोग्य स्वास्थ्या करिता प्रार्थना केली जाते . यूथ फेलोशिप तरुण मित्र मंडळ दर बुधवार व गुरुवार रोजी गीत गायन व वाद्य वादन सादर करतात . सर्व युवा एकत्र येवून वैचारिक बोधात्मक धार्मिक विषयांवर चर्चा विनिमय करतात .चर्च च्या सर्व शाखा मध्ये विश्वशांती करिता नित्यनियमांने दररोज प्रार्थना करण्यात येते . याच बरोबर
 शेतकरी , कष्टकरी , दींन -दुबळे , आजारी, यासह तळागाळातील गरीब तसेच राजकीय मान्यवर  व शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सुख शांति करिताही दररोज  प्रार्थना केली जाते .
सेंट पॉल अँगलीकन हाय चर्च.
नाशिक धर्मप्रांत भुसावळ सन,१९२७ प्रिस्ट इनचार्ज रेव्ह. ओ.एस.बुथ(१९२७- १९२८)
रेव्ह. जी.ई.गिव्हीनर
(१९२८ -१९३१)
रेव्ह. एन. बोवर
(१९३१-१९३)
रेव्ह. सी. इमरे
(१९३३ १९३५)
रेव्ह. केन
(१९३५ -१९३६)
रेव्ह. दिनकर आठवले
(१९३६- १९४७)
कॅनन जे. डब्ल्यू, डेवीड
(१९४७ -१९५७)
रेव्ह. एस.एस.चांदेकर
(१९५२ -१९५५)
रेव्ह. पी. पी. शिंदे
(१९५७ -१९६२)
१०)आर्च डिकन एस.आर.बळीद (१९६२ -१९७०)
११) रेव्ह. डि.व्ही.व्ही.साळवे
(१९७० -१९८२)
१२) रेव्ह. मधुकर यु.कसाब
(१९८२-१९८४)
१३) रेव्ह. सुहास बी. लोंढे
(१९८४ -१९९७)
*मराठवाडा धर्मप्रांत (सी.एन.आय.)*
*सन १९९९ पासुन प्रारंभ*
 रेव्ह.सुरेश एस.सोनवणे कार्यकाळ
(१९९७ -२००६),  रेव्ह. जी.सी.बर्वे
(२००६ -२०११),  रेव्ह. जेम्स कारंबेकर
(२०११- २०१२), रेव्ह. प्रविण वाय.घुले
(२०१२ -२०१७),
रेव्ह. किशोर अशोक गायकवाड (२०१७ पासून कार्यरत आहेत
Leave A Reply

Your email address will not be published.