विशेष महामना सुपरफास्ट गाडीचा केवडिया स्टेशनपर्यंत विस्तार

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- रेल प्रशासनातर्फे नव्याने सुरू करण्यात आलेले केवडीया स्टेशन पर्यंत दोन विशेष महामना सुपरफास्ट गाडीचा विस्तार करण्यात आला आहे या गाड़ी बडोदा स्टेशन ऐवजी केवडीया स्टेशन पर्यंत धावणार आहे.

विवरण पुढील प्रमाणे
1)रीवा केवडीया विशेष महामना सुपरफास्ट गाडी
*गाडी क्रमांक 09105 डाउन केवडिया-रीवा महामना विशेष सुपरफास्ट गाडी ही दिनांक 22.01.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी केवडीया स्टेशन हुन 18.55 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी रीवा स्टेशन येथे 17.15 वाजता पोहोचेेल.

गाडी क्रमांक 09106 अप रीवा केवडीया महामना विशेष सुपरफास्ट गाडी दिनांक 23.01.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवार ला रीवा स्टेशन हुन 20.55 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी केवडीया स्टेशन येथे 17.40 वाजता पोहोचेल.

स्टॉप- खंडवा,भुसावळ,जळगाव
2)वाराणसी केवडीया विशेष महामना सुपरफास्ट गाडी
*गाडी क्रमांक 09103 डाउन केवडिया-वाराणसी महामना विशेष सुपरफास्ट गाडी ही दिनांक 19.01.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवार ला केवडीया स्टेशन हुन 18.55 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी वाराणसी स्टेशन येथे 23.10 वाजता पोहोचेल.
*गाडी क्रमांक 09104 अप वाराणसी केवडीया महामना विशेष सुपरफास्ट गाडी दिनांक 21.01.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवार ला वाराणसी स्टेशन हुन 05.25 वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी केवडीया स्टेशन येथे 09.15 वाजता पोहोचेल.

स्टॉप- भुसावळ
या विशेष ट्रेनच्या थांबे, संरचना आणि वेळेत कोणताही बदल झालेला नाही.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
—- —- —

Leave A Reply

Your email address will not be published.