मसूद अझहर जिवंत! पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात उपचार

0

नवी दिल्ली :- पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा बालाकोटवरील हल्ल्यामध्ये भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र, ‘जैश-ए-महंमद’ने पत्रक काढून मसूद जिवंत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, मसूदवर पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याशिवाय अन्य कोणतीही माहिती मिळत नसल्याचे एका भारतीय अधिकाऱ्याने म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइक हल्ल्यात ‘जैश-ए-महंमद’चा तळ उद्ध्वस्त केला. या हल्ल्यामध्ये २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. या हल्ल्यामध्ये मसूद अझरही गंभीर जखमी झाला आणि उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे.

तर, मूत्रपिंडाच्या विकारांनी आजारी असल्यामुळे मसूद घराबाहेर पडू शकत नाही,असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीच सांगितले होते. मसूद अझर बालाकोटच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्याचे वृत्त पाकिस्तानातील काही माध्यमांनी दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.