मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात भाजपाने ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे पक्षांशी नाराज असलेल्या माजी महसूलमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचाही राज्यातील या स्टार प्रचारकाच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रचारात यांच्या नावाचा आहे समावेश
स्टार प्रचारकांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, सुषमा स्वराज, शिवराज सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, पीयूष गोयल या केंद्रीय नेत्यांसह राज्यातील माधव भंडारी, राम शिंदे, गिरीश महाजन अशा ४१ प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीतील स्थानिक राजकारण, जातीय समीकरणे, विरोधी पक्षांचे उमेदवार अशा विविध गोष्टी लक्षात घेऊन ही प्रचारकांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे.