भडगाव तालुक्यात फळबागायत लागवडीत होतेय वाढ

0

भडगाव (सागर महाजन) : यावर्षी भडगाव तालुक्यात चांगली आभाळमाया बरसली. गिरणा धरणही शंभर टक्के भरुन ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याची मुबलकता पाहता शेतकर्यांचा फळपिक लागवडीकडे अधिक कल दिसुन येत आहे.  शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत भडगाव तालुक्यात आतापर्यंत एकुण ९.७५ हेक्टर क्षेञावर फळपिकांची लागवड झाली असुन ही लागवड अजुनही वाढतांना दिसत आहे. लिंबु व मोसंबी फळ पिक लागवड जास्त होत आहे. आंबा, डाळींब, पेरु, सिताफळ, बोर यासह फळपिकांची लागवड शेतकरी करतांना दिसत आहेत.

भडगाव तालुक्यात आतापर्यंत एकुण ३ हजार हेक्टर क्षेञावर फळबाग पिकांची लागवङ करण्यात आली आहे. यात आतापर्यंत लिंबु १५०० हेक्टर, मोसंबी दिडशे हेक्टर, केळी १ हजार हेक्टर, डाळींब, आंबा, पेरु, बोर, साताफळसह इतर फळपिकांची ५० हेक्टर क्षेञावर लागवड करण्यात आली आहे. या  योजनेतुन फळपिक लागवडीला शंभर टक्के अनुदान मिळते. पुर्वीपासुन भडगाव तालुक्यात फळ पिकाची लागवड वर्षानुवर्षापासुन होत आहे. माञ यंदा फळपिकाच्या लागवडीत वाढ होउन गोड, रसाळ फळ पिकांचा गोडवा जनतेला चाखायला तर मिळणारच आहे. परंतु फळ पिक उत्पादक शेतकर्यांना चांगले उत्पन्न देउन परीवाराचा संसाराचा गाडा अन गोडवा साठी फायदयाचे ठरणार आहे.

याबाबत माहिती अशी कि, भडगाव तालुक्यात याआधीही लिंबु, मोसंबी, पेरु, आंबा, डाळींब, रामफळ, सिताफळ, बोर, जांभुळ यासह फळपिकांची लागवड शेतकर्यांनी केलेली आहे. गोड अन चविष्ट  , रसाळ फळपिकांची चव चाखण्यासोबतच शेतकर्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. सन २०२०, २०२१ अंतर्गत शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत आतापर्यंत एकुण ८९.८९ हेक्टर क्षेञाकरीता तर ११४ लाभार्थी शेतकर्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.  यो योजनेसाठी फळपिक लागवडीसाठी शासनाकङुन शंभर टक्के अनुदान मिळते. या रोजगार हमी योजने अंतर्गत अनुदान हे २३८ रुपये प्रतिदिन मजुरी प्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यावर ३ वर्षात जमा होते. फळपिकाला पाणी देण्याकरीताही मजुर लावता येतात.  फळबागांना शेतकरी ठिबक सिंचनचा मोठया प्रमाणात  वापर करीत आहेत, फळपिकांप्रमाणेच ठिबक सिंचनलाही शासनाकडून अनुदानाची रक्कम मिळते. झाडाना योग्य व समप्रमाणात पाणी मिळते. पाण्याचा अपव्यय होत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनचा मोठया प्रमाणात वापर करतांना दिसतात.तापर्यंत तालुक्यात नविन ९.३५ हेक्टर क्षेञावर फळपिकांची लागवड शेतकर्यांनी केलेली आहे. १३ शेतकर्यांची फळपिक लागवड झाली असुन उर्वरीत १०१ शेतकरी फळपिकाची लागवड करणार  आहेत.

या महिनाभरात सर्व शेतकर्यांची एकुण ८९ हेक्टर क्षेञावर फळपिकाची लागवङ पुर्ण होणार आहे.  भडगाव तालुक्यात एकुण ४ हजार हेक्टर क्षेञ असुन १५०० हेक्टर क्षेञापर्यंत विविध योजने अंतर्गत शासनाच्या अनुदानावर फळपिकांची लागवड शेतकर्यांनी केलेली आहे.  तसेच सन २०१९, २०२० यावर्षीही भङगाव तालुक्यात एकुण ३५ हेक्टर क्षेञावर फळबाग लागवड करण्यात आलेली आहे. भडगाव तालुक्यात फळबाग लागवडीतुन एकुण ६८ शेतकरी लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानाचा लाभ देण्यात आलेला आहे. मोसंबी व लिंबु लागवडीसाठी अनुदान हे प्रति हेक्टरी एकुण ६२ हजार रुपयांपर्यंत दिले जाते. डाळींब व आंब्यांसाठी साधारणता प्रती हेक्टरी सव्वा लाखांपर्यंत अनुदानाची रक्कम दिली जाते. पेरु लागवडीसाठी प्रती हेक्टरी १ लाख १२ हजार रुपये पर्यंत अनुदानाची रक्कम शासनाकङुन दिली जाते. अशी माहीतीही भडगाव तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर डे यांनी दै. लोकशाही शी बोलतांना दिली.

यावर्षी शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीला ११४ लाभार्थी व ८९.८९ हेक्टर क्षेञ लागवडीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकुण ९.३५ हेक्टर क्षेञावर फळपिक लागवङ करण्यात आलेली आहे. अदयापही तालुक्यात फळबाग लागवड सुरुच आहे. शासनाकडून फळबाग लागवडीला शंभर टक्के अनुदानाची रकमेचा लाभ मिळतो. लिंबु,केळी, मोसंबी, पेरु, आंबा, बोर, सिताफळ आदि फळपिकांची शेतकरी लागवङ करीत आहेत. भडगाव तालुक्यात सध्या लिंबु पिकाची सर्वाधीक लागवड होत आहे. यावर्षी पाण्याच्या मुबलकतेमुळे शेतकरी फळबाग लागवडीकडे वळलेले आहेत.   भडगाव तालुक्यात आतापर्यंत एकुण ३ हजार हेक्टर क्षेञावर फळबाग पिकाची लागवङ करण्यात आली आहे.
– बी. बी. गोरडे
तालुका कृषी अधिकारी. भङगाव.   

Leave A Reply

Your email address will not be published.