पोचोऱ्यात कॉंग्रेसची डिजिटल शेतकरी बचाव रॅली

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहर कॉग्रेस, युवक काँग्रेस, आरोग्य सेवा सेल, सह जळगाव जिल्हा शोशल मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बचाव रॅली चा डीजीटल कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

देशात भाजपा प्रणित मोदी सरकार ने शेतकरी विरोधात काळा कायदा आणुन शेतकर्‍यांना बरबाद करण्याचा विडा उचलला आहे. त्या विरोधात संपूर्ण देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला असुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉग्रेस चे नेते राहुल गांधी साथ देत आहे. याच कायद्या विरोधात महाराष्ट्रात ना. बाबासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात शेतकरी बचाव रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

पाचोरा शहर कॉग्रेस, युवक काँग्रेस, आरोग्य सेवा सेल, सह जळगाव जिल्हा शोशल मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका निरीक्षक शंकर राजपूत, जळगाव जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, जळगाव लोकसभा बुथ कमिटी अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील, शकील शेख, जावेद मुल्ला, प्रवीण पाटील, दिगंबर पाटील, समाधान अहीरे, फिरोज तडवी, गणेश मिसाळ, पी. डी. सोनवणे, पदमसिंग परदेशी, जगदेव बोरसे शुभम पाटील, गणेश पाटील, जामनेर चे संदीप पाटील आदी उपस्थित होते. डीजीटल रॅली मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.