दिलासादायक : भडगाव तालुक्यातील १६ रुग्णांना डिस्चार्ज

0

पाचोरा (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील एकूण १६ रुग्णांना  दि. १३ रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी आमदार किशोर पाटील उपस्थित होते. भडगाव तालुक्यातील एकूण २७७ रुग्णांपैकी २५० रुग्णांना आज पर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २० रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ११ जण भडगाव, ८ जण जळगाव येथे तर १ रुग्ण धुळे येथे उपचार घेत आहे. यापूर्वी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.