थॅलेसेमियाग्रस्त भावांडांच्या उपचारासाठी मदत

0

पाथरवट समाजातर्फे १० हजाराची मदत

भुसावळ:- तालुक्यातील कंडारी येथील हातमजूर रामभाऊ तायडे यांच्या दोन्ही मुलांना थॅलेसेमिया आहे. औषधोपचाराकरिता दरमहा १२ ते १५ हजार रुपये खर्च येत असतो. याकरिता दि.१३ मे रोजी खा. रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरवट समाजाचे निलेश पाथरवट यांनी या मुलांच्या उपचाराकरिता १०हजार रुपयांची मदत केली आहे.

पवन तायडे (वय १४)  व कुणाल तायडे या दोघांना थॅलेसेमिया या  आजार झालेला आहे याचे उपचाराकरीता सुमारे   8 ते 10 लाख रुपये खर्च लागणार आहे हा खर्च एका हातमजुराला न परवडणारा आहे .

आज रक्षाताई खडसे यांचा वाढ दिवासनिमित्त पाथरवट समाजाचे सामाजिक कार्यकर्ता निलेश रणदिवे यांनी कंडारी येथील रामभाऊ तायड़े यांच्या 2 लहान मुलांना उपचाराकरिता 10 हजार रुपयांची  मदत  देऊन चांगले कार्य केले आहे निलेश रणदिवे यांचा तर्फे आर्थिक मदत करण्यात आली त्याचे कार्याचे कौतुक होत आहे यावेळी रणदिवे यांचे सोबत त्यांचा पूर्ण मित्र परिवार सह  राजू गोसावी ,धुपेश चादेलकर, राहुल कोळी ,बंटी लोनारी, राजू कोळी, दीपक भोई, अविनाश गोठले , आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.