जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चिंचखेडा तवा सरपंचासह इतरांवर गुन्हा दाखल

0

जामनेर :- तालुक्यातील चिचखेडा तवा येथील सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना कार्यकर्ते मोहन रामजोशी व त्याच्या परिवाराला लोखंडी राॅड मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात आज सकाळी १७ रोजी अखेर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

दि. १४ मे रोजी शुल्लक कारणावरून चिचखेडा गावी रात्री आठ-साडेआठच्या सुमारास मोहन जोशी यांना रस्त्यात अडवणूक आरोपी रामदास जोशी, सरपंच गंगाराम श्रावण जोशी ,भगवान श्रावण जोशी, नारायण शेषराव जोशी ,विनोद प्रकाश जोशी ,प्रकाश बारकू जोशी, शेषराव श्रावण जोशी , यांनी संगनमताने लाठी काठीने मारहाण करून मोहन जोशी यांच्या डोळ्याला दुखापत केली. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात मोहन रामा जोशी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक किरण शिंपी हे करीत आहे .

 

Leave A Reply

Your email address will not be published.