जामनेरात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा

0

मोबाईल अँपद्वारे केली जाणार जनजागृती – प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याचे आवाहन

जामनेर  : –केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय डेंग्यू दिन दि 16 मे  रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी.एस.कमलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यात सर्वत्र साजरा करण्यात आला.

डेंग्यू आजारा विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करणे याकरिता 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येतो व आठवडा भर किटाकजन्य सर्वेक्षण करण्यात येते.

राष्ट्रीय डेंग्यू दिन प्रभावीपणे राबवण्यासाठी इंडिया फाइट्स डेंग्यू या मोबाईल अँप वापर केला जाणार आहे,यामध्ये डेंग्यू विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे याचा आहे याचा प्रचार सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत केला जाणारआहे.तालुका,प्रा.आ.केंद्र ,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय तसेच गाव पातळीवर लोकप्रतिनिधी,महिला मंडळ, बचत गट,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका,स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून प्रभात फेरी रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक,स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून,जिल्हा परिषद शाळा,माध्यमिक विद्यालय,कॉलेज,बँका यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत या सर्व स्तरातून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.बस स्थानक,बाजार,गर्दीच्या ठिकाणी डेंग्यूची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत माहिती दिली जाणार आहे.

रोटा व्हायरस लस लवकरच मोफत – खाजगी दवाखान्यात 2000 रुपयांना मिळणारी रोटा व्हायरस लस बाळाच्या वयाच्या 6व्या ,10 व्या व 14 व्या आठवड्यात आरोग्य विभागामार्फत लवकरच मोफत देण्यात येणार आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.तालुक्यातील सर्व आरोग्य सेविका व आरोग्य सेवक, गटप्रवर्तक,आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक यांचे डॉ.पल्लवी सोनवणे,डॉ.मनोज पाटील,डॉ.गौतम खिल्लारे,आशा कुयटे यांनी रोटा व्हायरस बाबत प्रशिक्षण घेण्यात आले.आरोग्य विस्तार अधिकारी बी.सी. बाविस्कर यांनी टँकर चालु असलेल्या गावविषयी व साथरोग बाबत आढावा घेतला.सदर प्रसंगी हिवताप व डेंग्यू, किटाकजन्य आजार याविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.