जिल्ह्यात आज ११९ कोरोना बाधित आढळले

0

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आज दिवसभरात ११९ कोरोना बाधित आढळून आले आहे. तर आजच २५५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरुप घरी परतले आहेत.यानिमित्ताने कोरोनाबाधीतांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या मागील काही दिवसाप्रमाणे आजही जास्त आहे. दरम्यान, एरंडोल, पारोळा तालुक्यात आज एकही कोरोनाबाधित आढळलेला नाहीय.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख खाली येत आहे. जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट हे दोन्ही महिने कोरोनाच्या तीव्र संसर्गाचे राहिल्यानंतर सप्टेंबरपासून नव्या बाधितांचा आलेख खाली येऊ लागला आहे. १७ सप्टेंबरपासून दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून त्यापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक नोंदली जात आहे. गुरुवारीही प्राप्त अहवालात दिवसभरात ११९ रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५१ हजार ५६९ झाली, तर २५५ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे झालेल्यांचा आकडा ४८ हजार ११७ वर पोचला. आज २ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृताच आकडा १२३५ वर गेला आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता केवळ २२१७ राहिली आहे.

जळगाव शहर – ४१, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ- ०६, अमळनेर-०४, चोपडा-०३, पाचोरा-०६, भडगाव-०७, धरणगाव-०३, यावल-१७, एरंडोल-००, जामनेर-०७, रावेर-०५, पारोळा-००, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०२,बोदवड-०१ आणि अन्य जिल्हा ०१ असे एकुण ११९ रूग्ण आज आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.