जनतेच्या व्यापक हित लक्षात घेवून पत्रकाराने वृत्तांकन करावे – ॲड नितीन खरे

0

भुसावळ (प्रतिनिधी)- पत्रकारांनी साेशल मिडीयावर बातमी टाकतांना अथवा अालेली बातमी फाॅरवर्ड करतांना त्या बातमीची खात्री करावी नंतर ती बातमी पुढे पाठवावी, जेणे करून चुकीचा संदेश जाऊन काेणाची बदनामी हाेईल, असे प्रकार स्पर्धेच्या युगातील पत्रकारांनी टाळले पाहीजे व लेखणीचा वापर पत्रकारांनी जनतेच्या हितासाठी करावा असे मत सरकारी वकील नितीन खरे यांनी व्यक्त केले. भुसावळ पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिनानिमीत्त पंचायत समिती सभागृहात अायाेजीत केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विलास भटकर,सरकारी वकील नितीन खरे,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठाेड, पंचायत समितीच्या सभापती मनिषा पाटील, पत्रकार संजयसिंग चव्हाण, शेख सत्तार,  नवलसिंग राजपूत उपस्थित हाेते.

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते  दिपप्रज्वलन करून  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . कार्यक्रमाचे प्रास्तावीक अाणि सूत्र संचालन श्रीकांत जाेशी (सर ) यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना अॅड.खरे म्‍हणाले  कि, पूर्वीची पत्रकारीता अाणि अाजची पत्रकारीता यात माेठा बदल झाला अाहे, पूर्वी पत्रकाराने लिहीलेली बातमी वृत्तपत्ताच्या कार्यालयापर्यत पाेचविण्यास अर्धा दिवस जात हाेता, मात्र अाता अद्यावत माेबाईलमुळे एका क्षणात कार्यक्रमाची बातमी व फाेटाे वृत्तपत्राच्या कार्यालयात पाेहचत अाहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार पत्रकारीता बदलली अाहे. वाचक वर्गाचे वर्गीकरण झाले असले तरीही प्रिंट मिडियाचे महत्व कमी होणार नाही . अाज स्पर्धेचे युग अाहे, प्रिंट मिडीयावर अजूनही वाचकांना विश्वास अाहे. मात्र साेशल मिडीयावरही ब्रेकींग न्यूज म्हणून बातम्या येत असतात, अाणि आपण त्या पुढे पाठवित असताे,मात्र या बातम्या पाठवितांना त्या बातम्यांची सत्यता पडताळून पहावी,नुसते ब्रेकींगच्या नावाखाली अफवा पसरविल्या जातील अशी पत्रकारीता करू नये, विनाकारण वा खोटे गुन्हे दाखल होवू नये याची काळजी घेतली पाहिजे असे सांगतांना पत्रकार संरक्षण कायदा बद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती  मार्मिक पद्धतीने दिली .

साेशल मिडीयावरील बातमी फाॅरवर्ड करतांना, त्या बातमीची खात्री करा, अापल्या बातमीने काेणाची विनाकारण बदनामी तर हाेणार नाही ना याची काळजी घ्यावी, असे अावाहनही यावेळी  अॅड. खरे यांनी केले.

सामाजीक भान ठेऊन  परखड पत्रकारीता करावी – डीवायएसपी गजानन राठाेड

लाेकशाहीतील चाैथा स्तंभ हा पत्रकारीतेचा अाहे. त्यामुळे पत्रकारांनी बातमी देतांना विचार करून बातमी द्यावी, ज्या बातमीने विनाकारण काेणाची बदनामी हाेईल अशी पत्रकारीता करू नये, सत्य निर्भिडपणे समोर आले पाहिजे ,बातम्या देतांना वास्तवतेचे व सामाजीक भान ठेऊन  परखड पत्रकारीता करावी, बातम्यांमध्ये विराेधाभास निर्माण निर्माण हाेईल असे वृत्ताकन करू नये, पत्रकाराची लेखणी ही निपक्षपणे चालली पाहीजे, असे अावांहन डीवायएसपी गजानन राठाेड यांनी केले.

पत्रकारही शेवटी माणूसच अाहे, हे लक्षात ठेवावे, कुठेही घटना घडल्यास तात्काळ पत्रकार तेथे पाेहचत असतात. त्यामुळे सत्य माहिती समाजासमाेर ठेवण्याचे काम पत्रकारांचे असल्याचे राठाेड यांनी सांगितले.यावेळी पंचायत समिती सभापती मनीषा पाटील व गट विकास अधिकारी विलास भाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या .प्रसंगी  मनीषा पाटील यांची नुकतीच पंचायत समिती सभापती पदी निवड झाल्याने त्यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी  उपस्थित मान्यवरांचे हस्ते अॅड.नितीन खरे , देशदूतचे निरज वाघमारे (मोना ) , लोकमतचे उत्तम काळे,दिव्यमराठी श्रीकांत सराफ, जनशक्ति गणेश वाघ,नवभारतचे विजयकुमार ठक्कर व छायाचित्रकार रवी पाटील उर्फ शाम गोविंदा यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वितेकरीता भुसावळ पत्रकार संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले . आभार संजयसिंग यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.