गांजा तस्करी प्रकरणातील आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी

0

मलकापुर:- इनोव्हा, ईरटीका कार मधून सात क्विंटल गांजा मलकापूर कडून बोदवड कडे जात असताना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी सह पोलिस कर्मचाऱ्यांनी पकडला यातील आरोपी नवीनरेड्डी सोमीरेड्डी वय 37 रा.शहापूर नगर संजय गांधी नगर जिल्हा मेडचल (तेलंगणा )यास पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातील दोन्ही गाड्या व सात क्विंटल गांजा असा एकूण एक कोटी दहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.दरम्यान आरोपीचे तिघे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.

आज यातील आरोपी नवीनरेड्डी सोमीरेड्डी यांस न्यालयासमोर उभे केले असता दि. 16 मार्च पर्यंत सात दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने सुनावला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here