मुरबाड पाटबंधारे विभागात कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट!

0

मुरबाड : मुरबाड पंचायत समिती विभाग अंतर्गत लघुपाटबंधारे विभाग या विभागात संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास कोणत्याच प्रकारचे कर्मचारी आढळून न आल्याने कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.

लघुपाठ बंधारे विभागामध्ये ज्या माणसांची कामे असतात ती पहावयास आली असता या विभागांमध्ये कोणत्याच प्रकारचा कर्मचारी शिपाई क्लार्क व अधिकारी आढळून न आल्याने कर्मचाऱ्यांचा माजोरीपणा स्पष्ट दिसून येत आहे प्रशासन सुन्न झाले आहे की काय असा प्रश्न समस्त मुरबाड नागरिकांना दिसून येत आहे फक्त महिन्याचा पगार घ्यायचा व काम मात्र काहीच करायचे नाही. असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे लघु पाट बंधारे विभाग बंद करण्याची मागणी नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.