एकनाथ खडसे ‘ईडी’च्या कार्यालात दाखल

0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी (पुणे) येथील भूखंड खरेदी प्रकरणी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावलीय. दरम्यानं, खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. खडसे ईडीच्या कार्यालयात नुकतेच दाखल झाले असून ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

भोसरी (पुणे) येथील भूखंड खरेदी प्रकरणी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) खडसे यांना नोटीस बजावलीय. ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी त्यांना मुंबई येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.या चौकशीसाठी खडसे २७ डिसेबरला मुंबईला रवाना झाले होते. मात्र, त्यांना कोरोनची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची “कोरोना’ चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे डॉक्‍टरांनी त्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते.

याबाबत त्यांनी ईडी कार्यालयास कळवून मुदत मागून घेतली होती. त्यांनीही त्यांची मुदतवाढीची मागणी मंजूर केली होती. त्यांना देण्यात आलेली मुदत आता संपली आहे.

एकनाथ खडसे मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. क्वारंचाईनमुळे थोडा विकनेस जाणवत आहे. ईडीने बोलावले आहे. त्यांना मी सर्व कागदपत्रे सादर करणार आहे. सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचेही खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.