आमिषाला बळी न पडता विद्यार्थींनींनी सर्वांगाने सक्षम व्हावे – पोलिस उपअधीक्षक ईश्र्वर कातकडे

0

– पाचोरा महाविद्यालयात महिला सुरक्षा व सायबर कायदे या विषयावर कार्यशाळा
पाचोरा –
विद्यार्थींनी व महिला आमिषाला बळी पडत असुन महिलांनी सर्वांगाने सक्षम झाले पाहिजे. मोबाईल हाताळतांना बुध्दीवर ताबा ठेवुन त्याचा वापर करावा. मोबाईलचा वापर चुकीच्या मार्गाने होत असुन त्याचा वापर हा केवळ अभ्यासासाठीच करावा. असे सांगून त्यांनी सायबर कायद्याबाबत सखोल माहिती देवुन महिलांनी प्रसंगावधान राखून स्वत:चे संरक्षण करावे. त्यांचेतील असलेले सामर्थ्य दाखविल्याशिवाय महिलांचे सबलीकरण होवु शकणार नाही. अशी माहिती पोलिस उपअधीक्षक ईश्र्वर कातकडे यांनी पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात विद्यार्थी विकास व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे जयंती निमित्त आयोजित कार्यशाळेत दिली.

याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पी.टी.सी.चे व्हा. चेअरमन विलास जोशी, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, उपप्राचार्य एस. एम. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्राध्यापिका कल्पना जंगम, प्रा. सुनिता गुंजाळ व्यासपिठावर होत्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी मनोगतातुन सांगितले की, सद्याचे युग हे यांत्रिक युग असुन या यांत्रिकीकरणामुळे दिवसेंदिवस नौकरीच्या संधी कमी होवु लागल्या आहेत. मोबाईलचा वापर स्पर्धा परिक्षेसाठी करुन स्वत: मधील स्कील आत्मसात करा. अशिक्षण, अन्याय व अंधश्रध्देपासुन मुक्ती झाल्याशिवाय महिलांचे सबलीकरण होणे शक्य नाही. चांगल्या गोष्टींची सवय स्वत:पासुनच व घरापासुन लागली पाहिजे. स्वत:चे रक्षण करणे हे स्वत:च शिकले पाहिजे. स्वत: चे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.

तसेच प्राध्यापिका कल्पना जंगम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजात आजही महिलांच्या सहन शक्तींचा अंत केला जात असुन सासु, नणंद याही महिलाच असुन व कुटुंबातील महिलांचा छेळ होत असतो. युवतींने घराबाहेर पडतांना एक संघ राहुन समाजातील विकृत शक्तींना टाळ्यावर आणण्याची गरज आहे. पुरुषांशिवाय, महिलांचे सबलीकरण होणे शक्य नाही. तर प्रा. सुनिता गुंजाळ म्हणाल्या की, समाजात सार्वांगिण प्रगती साधायची असेल तर स्रियांंना मागे राहुश चालणार नाही. घरातील मुलगा – मुलगी या दोघांना समानतेची वागणुक दिली पाहिजे. व महिलांनी उपजत शक्तीचा वापर केला पाहिजे.

तर प्रा. शैलैजा पाटील यांनी सांगितले की, महिला सुरक्षेसाठी आधुनिक कार्यपद्धती कार्यरत असुन महिलांनी तिचा वापर केला पाहिजे. महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असुन स्वत: मध्ये आत्मविश्वास मनात आणल्यास अनुचित प्रकार घडणार नाही. आपल्याकडे आजही गर्भधारणेपासुनच मुलां – मुलींमध्ये भेदभाव करण्याची पद्धत असुन ही पद्धत मोळकडीस आणली गेली पाहिजे. मुला – मुलींना सुरवातीपासुनच समान न्याय हक्क देण्याची प्रवृत्ती जोपासल्यास मुली ही मुलांप्रमाणेच निर्भयपणे जीवन जगतील. कार्यक्रमास परिवेक्षक प्रा. जी. बी. पाटील, प्रा. कमलाकर इंगळे, प्रा. राजेश मांडोळे, प्रा. श्रावण तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. कविता पाटील, उर्मिला पाटील, प्रा. व्ही. बी. देसले, श्रीमती एम. डी. चव्हाण, प्रा. एस. आर. पवार, विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बोरकर यांनी केले. आभार वासंती चव्हाण यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.