युफोरीया २०२३ स्नेहसंमेलनात गोदावरी एक्सप्रेसने केली भारत भ्रमंती

0

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी सीबीएससी स्कूल तर्फे आयोजित युफोरिया २०२३ या सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन करण्यात आले. ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांचे दीप प्रज्वलन आणि उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित भारत पेट्रोलियमचे व्यवस्थापक कमलेशकुमार,सौ.प्रिया कुमार, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील गोदावरी सीबीएससी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासोबत जून्या नव्या गितांचा नजराणा सादर केला.

लहान मुलांमधील कलागुणांना सुप्त वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन हे प्रमुख व्यासपिठ असल्याचे कमलेश कुमार यांनी सांगितले तर डॉ. वर्षा पाटील यांनी संगीत ही साधना आहे आणि ही रूजवण्याचे कार्य संगीत शिक्षक करतात. या शिक्षकांचे अभिनंदन करीत शिक्षकाबरोबर घरातून मुलांवर संस्कार टाकले पाहीजे यात शिक्षक, मोठयांचा आदर याचबरोबर दैनदिन जिवनातील गरजा पुर्ण करीता सामाजिक वातावरणत वावरतांना अनेक गोष्टी मुलांना शिकवल्या गेल्या पाहीजे असे सांगीतले. कार्यक्रमाचा समारोप आशा है या गिताने करण्यात आला. .या कार्यक्रमासाठी सौ रंजना कदमबांडे आणि श्री पंकज भावसार व गुरव सर यांनी मेहनत घेतले.

गोदावरी सीबीएससी स्कूल तर्फे आयोजित युफोरिया २०२३ या सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन प्रशांत कवटे( प्रेसिडेंट लीग्रंट कंपनी),श्याम लोही (आरटीओ डेप्युटी),गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सचिव डॉ .वर्षा पाटील गोदावरी,डॉक्टर केतकी वैभव पाटील, गोदावरी इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ .विजय पाटील, गोदावरी मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके , एन जी. चौधरी सर,स्कूलच्या प्राचार्या सौ.निलीमा चौधरी,भुसावळ स्कुल प्राचार्य अनघा पाटील व सावदा स्कुल प्राचार्य भारती महाजन आदी उपस्थितीत प्रारंभ झाला.

या प्रसंगी प्रशांत कवटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होणे अतिशय महत्त्वाचे असते,तर श्याम लोही यांनी पालकांना आवाहन करतांना लहान मुलांना गाडी हातात देवू नका कारण कोविड मध्ये आपण आपले बरेच जवळचे लोक गमावले तसे अनपेक्षीत होणार—या अपघातात घडू नये म्हणून गाडी चालवतांना नियमांचे पालन करा असे सांगीतले. तसेच स्कूलच्या प्राचार्या सौ नीलिमा चौधरी यांनी स्कूलचा अहवाल सादर केला.विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व ध्येय साध्य करण्यासाठीचे मार्गदर्शन केले व जागतिक स्तरावरच्या शिक्षण पध्दती गोदावरीत उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन डॉ. उल्हास पाटील यांनी दिले

.यावेळी इ. १० व १२वी सी.बी.एस.ई परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर करून आपल्या नृत्यातून राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती चे संदेश दिले. विविध प्रकारच्या कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या जळगाव जक्शन वरून सुरू झालेली गोदावरी एक्सप्रेस संपुर्ण भारत भ्रमण करत गोदावरी स्कुलमध्ये पोहचली.पॅट्रीयाटीक नुृत्याने स्नेहसमेलनाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अदिती तरलकर , कौशल खाचने परीक्षेत कुटे, मनस्वी नंदरवर ,युजरा मीर, संजना गाडगे, अनिकेतन सिंग, लकी पाचपिले या विद्यार्थ्यांनी केले सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.