धक्कादायक.. माजी ग्रामपंचायत सदस्याच्या आईला मारहाण

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

माजी ग्रामपंचायत सदस्याच्या आईने तालुक्यातील सावखेडा सिम येथे अतिक्रमणित जागेवर एकाने घर बांधण्यासंदर्भात तक्रार दिल्याने शेजारच्या दोन जणांनी महिलेस बेदम मारहाण केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदुबाई नुथ्थु भालेराव (वय ६५, रा. सावखेडा सिम ता. यावल) या दि.२४ मे रोजी सकाळच्या सुमारास आपल्या शेजारी राहणाऱ्या गोविंदा श्रावण सोनवणे आणि सुरेखा गोविंदा सोनवणे यांनी अतिक्रमणाच्या जागेवर बांधकाम सुरू केले असुन सदरच्या त्या घरकुलचे बांधकाम बाबत ईंदुबाई भालेराव या त्यांना अतिक्रमणाबाबत जाब विचारण्यास गेल्या असता दोघे पती पत्नी यांनी सार्वजनिक शिवीगाळ करून बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी इंदुबाई सुनिल भालेराव यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संबधीत दोघ पती पत्नी विरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असुन वाद घालणाऱ्या दोघ कडील मंडळींना पोलीसांनी समज दिली आहे .

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला इंदुबाई नथ्थु भालेराव या सावखेडा सिम ग्रामपंचायतचे माजी ग्राम पंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सुनिल नथ्थु भालेराव यांच्या आई असुन सुनिल नथ्थु भालेराव यांनी दि. २१ एप्रिल रोजी यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या हद्दीतील नमुना क्रमांक ८ सि .स. क्र. ३२३ या मिळकतीवर अतिक्रमणच्या जागेवर सुरू असलेल्या शासनाच्या रमाई आवास योजने अंतर्गत गोविंदा श्रावण सोनवणे यांचे होत असलेल्या बेकाद्याशीर घरकुलच्या बांधकामासंदर्भात लिखित तक्रार केली.

यावल पंचायत समितीतर्फे रमाई आवास योजनेव्दारे मंजुर करण्यात आलेले हे घरकुलाचे काम नियमबह्य असल्याचे म्हटले असुन या लाभार्थ्यांस घरकुल मिळाले कसे असे प्रश्न उपस्थित केले असुन या सर्व प्रकाराची गटविकास अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.