यावल बसस्थानकात सुरक्षितता अभियान सप्ताहास प्रारंभ

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आपल्या एसटी बसचा प्रवास हा सुरक्षित असून इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत होणाऱ्या अपघातात एसटी बसगाडयांच्या होणाऱ्या अपघाताची संख्या ही फारच कमी आहे. अपघातास केवळ वाहनचालकच कारणीभूत आहेत असे नसते तर अपघात टाळण्यासाठी सर्वप्रथम आपल्या परिसरातील रस्ते चांगले असणे अत्यंत गरजे आहे. याशिवाय वाहन चालवित असतांना समोरील येणारे वाहन हे योग्य दिशेने येणे देखील महत्वाचे आहे अशी अनेक कारणे ही अपघातास कारणीभूत असतात, त्यासाठी सर्व वाहन चालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मार्गदर्शनपर माहिती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली.

यावल एसटी महामंडळाच्या यावल आगाराच्या वतीने परिसरातील सभागृहात सुरक्षित अभियान पंधरवाडयाच्या निमित्ताने एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन संजय गांधी निराधार समितीचे नायब तहसीलदार मनोज खारे, प्रजापती ईश्वरीय ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या जयश्री दिदी यांच्यासह यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन आदी मान्यवरांची उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस  हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तर अतुल पाटील यांच्याहस्ते फित कापुन सुरक्षित अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन, जयश्री दिदी यांनी उपस्थित एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता विषयी योग्य माहिती दिली. प्रवाशी हे  आपल्याच परिवारातील सदस्य आहेत असे समजूनच आपण गाडी योग्य पद्धतीने चालवावी असे एसटी ड्रायव्हर कंडक्टर प्रवासी या संदर्भात बोलले व मार्गदर्शन केले.  कार्यकमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार किशोर मंदवाडे यांनी मांडले. या कार्यक्रमात यावल तालुक्यातील प्रतिनिधी  व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.