यावल तालुका मराठा समाज आक्रमक; बकालेंच्या बडतर्फीची मागणी

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाजाविरुद्ध अश्लील भाषेत संभाषण करत समस्त मराठा समाजाची मानहानी केल्याने तालुक्यातील मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना बकाले यांना बडतर्फ करण्याच्या  मागणीचे निवेदन देत समाजाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. बडतर्फ करण्याची कारवाई न केल्यास समाजाच्या वतीने राज्यस्तरीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे.

येथील तालुका मराठा समाजाच्या वतीने भुसावळ रस्त्यावरील तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशनपर्यंत भर पावसात शेकडोच्या संख्येने मोर्चा नेत तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, जि. प. माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील यांनी तीव्र भावना व्यक्त करत समाजाच्या वतीने बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. बडतर्फ न केल्यास समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे.

आंदोलनात किनगावचे विजयकुमार देवचंद पाटील, दहिगावचे उपसरपंच देविदास धांगो पाटील, देवकांत पाटील, वसंत पाटील, प्रा.संजय पाटील, प्रा.संजय कदम, छाया अतुल पाटील, वर्षा अजय पाटील, मनीषा अनिल गावडे, डी.सी .पाटील, एड. डी .आर.बाविस्कर, दिनकर क्षीरसागर, सुनील गावडे,

अँड. देवकांत पाटील, दत्तात्रय पाटील, डी.जे. पाटील, गणेश महाजन, ए .एन.यादव, एम.ए .पाटील, किरण शिंदे, बापू जासूद, तुषार येवले, दिलीप इंगळे, विलास येवले, हेमंत येवले, प्रा.मुकेश येवले, एकनाथ शितोळे, समाधान पाटील, दौलत मराठे, यशवंत जासूद, रवींद्र टोंगळे, यशवंत भोईटे, निलेश पवार, प्रकाश पवार, भूषण पवार, अशोक पाटील, शैलेश पवार, पप्पू पाटील, विजय यादव, गोपाल जासूद, विजय पाटील, समीर पवार, सुनील येवले, महेश पाटील, प्रवीण पाटील, अमोल खैरनार, एन.पी. चव्हाण, योगेश चव्हाण, अनिल सोनवणे, अक्षीत जासूद, संजय पाटील, राकेश शिर्के, विलास पवार, नरेंद्र पाटील, गणेश येवले, गोकुळ भोईटे यांचे सह तालुक्यातून अनेक समाज बांधव उपस्थित होते.

सामाजिक तेढ निर्माण करणारे अधिकारी कलंक

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, राज्यात मराठा समाज पालकत्वाची भूमिका निभावत असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जात असताना पोलीस विभागातील एका जबाबदार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने समाजाविषयी असं संभाषण करणे म्हणजे पोलीस विभागाला कलंक असल्याचे म्हटले. याप्रसंगी माझी जि. प. सभापती रवींद्र पाटील, अजय पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेतल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.