यावल वन विभागाच्या ताब्यातून तीन आरोपी फरार

0

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सातपुडा पर्वतातील यावलपूर्व क्षेत्रामधील अवैध सागवान वृक्षतोड वृक्ष लाकूड वाहतूक व जमिनी अंतर्गत केलेल्या तीन आरोपींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणले असता ते तिघे आरोपी फरार झाल्याची घटना दि. 12 रोजी रात्री घडली. यामुळे  तालुक्यात वन विभागावर संशय व्यक्त केला जात आहे.

दि. 12 रोजी यावल पूर्व क्षेत्रातील तीन आरोपी वनविभागाने ताब्यात घेतले होते. सहाय्यक वन संरक्षक हडपे यांचे कार्यक्षेत्रातील सागवान वृक्ष लाकूड वाहतूक व वन जमिनीमध्ये अटक केलेले तीन आरोपी प्यार सिंग पावरा, सुरेश पावरा, बिलाल सिंग पावरा यांना दिनांक 12 रोजी भुसावळ येथील न्यायालयात त्यांची तारीख असल्याने नेले होते तसेच यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

तिन्ही आरोपींना पोलीस कस्टडीत ठेवण्याची पूर्तता करण्यात येत असताना रात्री सात ते आठ वाजेचे दरम्यान वनविभाग कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असलेले फरार झाले. यावल पूर्व वनक्षेत्रापाल विक्रम पदमोर यांच्याशी लोकशाहीने संपर्क केला असता त्यांनीही याबाबतचा दुजोरा दिला आहे.

फरार झालेले आरोपी प्रकरण तालुक्यात एक चर्चेचा विषय झालेला असून वन विभागावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.  ज्या कर्मचाऱ्यांच्या हातून आरोपी फरार झालेत त्यांचेवर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.