यावल महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त परीसंवाद संपन्न

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी “वाचन प्रेरणा” दिन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. एस. एस. पाटील (सेवानिवृत्त प्राचार्य, फैजपूर महाविद्यालय) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या तरुणाई मध्ये वाचन संस्कृती जोपासली पाहिजे स्मरणशक्ती, विवेकबुद्धी, निर्णय घेण्याची क्षमता, यासाठी चांगला मित्र म्हणून पुस्तकाकडे बघितले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील पुस्तकी ज्ञानाबरोबर अवांतर वाचनही केले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास तरुणाईला प्रेरणा देत आहे. व्यावहारिक, दैनंदिन जीवनात स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान महत्त्वाचे आहे,असे सांगितले.

कार्यक्रमाचे दुसरे वक्ते डॉ.नरेंद्र महाले ( उपशिक्षक, सरस्वती विद्यामंदिर यावल) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले पुस्तक ही ज्ञानाची भुक भागवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिक्षण घेण्याबरोबरच अवांतर वाचनही केले पाहिजे. त्यासाठी ज्ञानसाधना महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार मार्गदर्शन करताना भारताचे माजी. राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे थोर वैज्ञानिक शास्त्रज्ञ होते. त्यांची देशाला मिसाईल मॅन म्हणून ओळख आहे. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी वाचनावर जास्त लक्ष दिले. पुस्तक ही तरुणांची धनसंपत्ती आहे, असे कलाम म्हणत. हे उदाहरण देऊन सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलवर खर्च करण्यापेक्षा पुस्तक विकत घेऊन वाचन करून शब्दसंग्रह वाढवला पाहिजे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुभाष कामडी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले. तर आभार विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ .एस. पी. कापडे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, डॉ.आर. डी. पवार, डॉ.अनिल पाटील, ग्रंथपाल संतोष ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संतोष जाधव, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. मिलिंद मोरे, प्रा. प्रशांत मोरे, प्रा. अर्जुन गाढे, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. छात्रसिंग वसावे, प्रा. अक्षय सपकाळे, प्रा. रजनी इंगळे, श्री. मिलिंद बोरघडे, श्री. प्रमोद भोईटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ग्रंथ प्रदर्शनाने झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.