Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»यावल येथील समायोजन अतिरिक्त शिक्षक यादीत घोळ, वेगवेगळ्या संघटनेचे निवेदन
    जळगाव जिल्हा

    यावल येथील समायोजन अतिरिक्त शिक्षक यादीत घोळ, वेगवेगळ्या संघटनेचे निवेदन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 20, 2023Updated:September 20, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    यावल तालुक्यातील शिक्षण विभागाचा प्रकार जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंगर कठोरा येथील आदिवासी समाजाचे प्राथमिक शिक्षक इस्माईल जहान तडवी यांना सेवाजेष्ठता यादीत वगळून दुसऱ्या शिक्षकाचे नाव सेवा जेष्ठता मध्ये घेण्यात आले. या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार केल्याचे आदिवासी, तडवी, भिल्ल, एकता मंच व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट या संघटनेच्या माध्यमातून निवेदन माननीय जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यावल, यांना निवेदन सादर करून या अतिरिक्त शिक्षक समायोजन यादीची सेवा पुस्तिकेनुसार तात्काळ चौकशी करावी व अन्याय झालेला शिक्षकांना सेवा जेष्ठता यादी मध्ये घेण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंगर कोठारा येथील प्राथमिक शिक्षक इस्माईल जहान तडवी यांना जाणून-बुजून सेवा जेष्ठता यादी मध्ये घेतले नसल्यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा अंतर्गत1989 नुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.

    सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंगर कोठारा येथील प्राथमिक शिक्षक इस्माईल जहान तडवी यांनी एक महिन्यापासून यांना तक्रार अर्ज केलेला असून सुद्धा त्यांच्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल गट विकास अधिकारी यांनी घेतली नाही. समायोजन अतिरिक्त शिक्षक यादीवर 14 तारखेला हरकत घेतल्यावर सुद्धा सय्यद आदिल हुसेन हिफाजत अली यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने तीन महिन्याचा खंड असून सुद्धा शिक्षक सेवा जेष्ठ यादीमध्ये येत नसल्यावर गटशिक्षणाधिकारी व कार्यालयीन अधीक्षक व त्यांचे सहकारी यांनी आर्थिक व्यवहार करून या याद्यांमध्ये घोळ केला आहे. यावल तालुक्यातील समायोजन अतिरिक्त शिक्षक यादी मध्ये चांगलाच भ्रष्टाचार केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची तात्काळ माननीय जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन चौकशी करावी. येत्या पंधरा दिवसात या यादीची चौकशी न झाल्यास आदिवासी, तडवी भिल्ल, एकता मंच जिल्हाध्यक्ष सलीम छबु तडवी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद जळगाव यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    समायोजन अतिरिक्त शिक्षकांच्या यादीवर तात्काळ दखल घेण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू भाऊ पारधे यांनी गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन तसेच आदिवासी, तडवी, भिल्ल एकता मंच यांनी माननीय वरिष्ठ संशोधन अधिकारी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग वरळी यांना ई-मेल पाठवलेला आहे.

    निवेदन सादर करताना रब्बील तडवी जिल्हा संघटक यावल तालुका अध्यक्ष, अश्फाक छबु तडवी कार्याध्यक्ष, फिरोज कडवी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, अमित तडवी तालुका सचिव पत्रकार, जुम्मा तडवी शाखाध्यक्ष, फिरोज तडवी यांनी सुद्धा निवेदन सादर केलेले आहे.

    Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif