WMO; पुढील पाच वर्षात मानवाला पृथ्वीवर राहणे अशक्य

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

दरवर्षी तापमान वाढ होत असल्याचे जाणवत आहे. आणि जागतिक हवामान संघटनेच्या अहवालातून असे समोर आले आहे कि येत्या पाच वर्षात मानवाला पृथ्वीवर राहणे देखील अशक्य होणार आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) बुधवारी एक धक्कदायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात सांगण्यात आले आहे. येत्या पाच वर्षात संपूर्ण जगाचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल. यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णताही वाढणार आहे.

२०२७ पर्यंत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याची ६६ टक्के शक्यता असल्याचंही संघटनेने म्हटलं आहे. ब्रिटनच्या मेट ऑफिस हॅडली (Met Office Hadley) सेंटरमधील लॉन्ग रेंज प्रेडिक्शन प्रमुख अॅडम स्कॅफे म्हणाले की, पुढील चार ते पाच वर्षांत आपल्याला उष्णतेची ऐतिहासिक विक्रमी पातळी पाहायला मिळू शकते. तापमान दीड अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकतो. गेल्या वर्षी आलेल्या अहवालात याची शक्यता ५०-५० होती. पण पुन्हा केलेल्या अभ्यासानुसार आता ही शक्यता ६६ टक्के इतकी झाली आहे. ज्या भयानक अहवालात ही गोष्ट उघड झाली आहे, त्याला ‘ग्लोबल अॅन्युअल टू डेकॅडल क्लायमेट अपडेट’, असे नाव देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.