व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आता ठेवता येणार १ आठवडा !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवलेलं स्टेटस हे २४ तासांमध्ये गायब होत. त्यामुळे एखादी गोष्ट अधिक काळ स्टेटसवर ठेवायची असेल, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती स्टेटसला ठेवणं हाच पर्याय असतो. मात्र, आत हि अडचण लवकरच दूर होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता एका नवीन फिचरवर काम करत आहे. यामुळे युजर्सला एक स्टेटस दोन आठवड्यांपर्यंत ठेवता येणार आहे. WABetainfo वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉईड बीटा 2.23.20.12 या व्हर्जनमध्ये हे अपडेट देण्यात आलं आहे. अ‍ॅड स्टेटस हा पर्याय निवडल्यानंतर पुढे आणखी ऑप्शन दिसणार आहेत. यामध्ये यूजर्सना हे स्टेटस 24 तास, 3 दिवस, 1 आठवडा आणि 2 आठवडे ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असेल.या फीचरची सध्या चाचणी सुरू आहे. काही दिवसांमध्ये कदाचित सर्व यूजर्सना हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अर्थात, याबाबत अधिकृत माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.