वढोदा येथे आज सत्कार समारंभ

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

वढोदा येथील माजी सरपंच डॉ रुपाली प्रभाकर सोनवणे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल व चेतन अवधूत सोनवणे यांची पोलिस पाटील पदी निवड झाल्याने विविध मान्यवरांचा उपस्थित सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला आहे.

जि.प.गट नेते तथा यावल तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांची कन्या डॉ रुपाली सोनवणे यांनी पाच वर्ष ग्रामपंचायत सरपंच म्हणून समाज सेवा बरोबर एमपीएसचा अभ्यास करुन महाराष्ट्रात महिला प्रवर्गातून पहिल्या क्रमांकाने पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली तर त्यांचे बंधु कै.अवधुत सोनवणे यांचे सुपुत्र चेतन सोनवणे पो.पाटीलपदी निवड झाल्याने दि.३० आँक्टोबंर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेला नारायण आप्पा चौक वढोदा येथे सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यस्थांनी जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, फैजपुर पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, सेवानिवृत्त पो.डी.वाय.एस.पी.राजेद्र रायसिंग, दिलीप सुर्यवंशी, जि.प.गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, डोबंवली येथील कीशोर कोळी, यावल तहसिलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पो.नि.राकेश मानगावकर,यावल प.स.गटविकास अधिकारी मजूंषा गायकवाड उपस्थीत राहणार असून उपस्थितीचे आवाहन तंटामुक्तगाव समितीचे अध्यक्ष उत्तम सोनवणे, सरपंच संदिप सोनवणे, वि.का.सो.चे व्हाईस चेअरमन नरेद्र सोनवणे, उपसरपंच गोपाल चौधरी सह ग्रामपंचायत सदस्स व वढोदा ग्रामस्थ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.