पावसाचा जोर वाढणार ! या भागांना दिलाय अलर्ट 

0

 

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच आज संपूर्ण विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह, ठाणे पालघर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी कर नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे

Leave A Reply

Your email address will not be published.