महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

0

लोकशाही न्युज नेटवर्क
जळगाव शहरातील एका परिसरात मैत्रिणीसोबत आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत बुधवारी १८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात ४२ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता महिला ह्या त्यांच्या मैत्रिणी सोबत जळगाव शहरातील एका भागात वस्तू खरेदीसाठी आल्या होत्या. वस्तू खरेदी करत असताना संशयित आरोपी रईस युसूफ बागवान, नबील आसिफ बागवान आणि शिबान रईस बागवान तिघे रा. जळगाव यांनी महिलेकडे वाईट हेतूने बघून धक्काबुक्की व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने मैत्रिणी सोबत जळगाव शहर पोलीस ठाणे गाठत तिघांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता संशयित आरोपी रईस युसुफ बागवान, नवीन आसिफ बागवान आणि शिबान रईस बागवान सर्व राहणार जळगाव यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.