भयंकर.. तरुणाला 30 दिवसात 5 वेळा सर्पदंश

जिथे लपला साप तिथेही पोहोचला

0

फतेहपूर, लोकशाही न्युज नेटवर्क 

उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर येथे एक विचित्र घटना घडली आहे. एका तरुणाला महिन्याभरात तब्बल पाच वेळा साप चावला. विशेष म्हणजे तरुणावर उपचार केल्या नंतर तो बराही होतो. विषारी साप चावल्यानंतरही तरुण सारखा बरा कसा होतो, या गोष्टीमुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत.

तरुणाने सापाच्या भीतीने राहातं घर सोडलं आणि आपल्या मावशीच्या घरी तो राहाण्यासाठी गेला मात्र तिथेही साप पोहचला. ज्या घरात तरुण राहात होता, तिथे जाऊन साप त्या तरुणाला चावला.

उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर जिल्ह्यातील मलवा इथल्या सौरा गावची आहे. सौराव गावात 24 वर्षांचा विकास दुबे हा तरुण राहातो. गेल्या महिन्याभरात विकासला तब्बल 5 वेळा साप चावला आहे. साप चावल्यानंतर घरचे त्याला रुग्णालयात दाखल करतात, आणि प्रत्येकवेळी उपचारानंतर तो ठिक होतो. आताही एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत दोन दिवसांपूर्वीच सापाने त्याला दंश केला होता.

एकाच महिन्यात पाचवेळा सापाने दंश केल्याची बातमी आता चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.