EDची मोठी कारवाई; 45 कोटींची मालमत्ता जप्त

0

उस्मानाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशासह राज्यात गेल्या काही महिन्यात ईडीच्या (ED) वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एका कंपनीवर ईडीने कारवाई केली आहे. उमरगा (Umarga) एमआयडीसी (MIDC) येथील जोगेश्वरी ब्रिव्हरेज (Jogeshwari Brewery Company) या खासगी कंपनीची 45.50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

या कंपनीने मालक कोल्हापूर (Kolhapur) येथील असून ही कंपनी दारू निर्मिती करणारी कंपनी आहे. मात्र गेल्या 5-6 वर्षांपासून या ठिकाणी कंपनीचे काम बंद असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे (Umesh Dhondiram Shinde) व देवेंद्र उमेश शिंदे (Devendra Umesh Shinde) हे पिता पुत्र संचालक असलेली फॅक्टरीची मालमत्ता व मशिनरी जप्त केली असल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद-मुंबई मार्गावर ही कंपनी आहे, पण ही कंपनी बंद आहे. मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत (Money Laundering Act) ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनी कायद्यांतर्गत जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची (Jogeshwari Breweries Private Limited Company) 5 मार्च 2009 रोजी नोंदणी करण्यात आली आहे. या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल 15 कोटी आहे, तर पेड कॅपिटल हे 2 कोटी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ही 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली होती. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीचे ऑडिट करण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे तर 133602 हा नोंदणी क्रमांक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (Ministry of Corporate Affairs) या अंतर्गत याची नोंदणी असून दारू निर्मिती हे कंपनीचे काम असल्याचा उल्लेख त्यात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.