रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीत बॅग आढळल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाने काही परिसर सील करण्यात आला होता.

गुरुवार दि. १४ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅग आढळून आली. या बॅगला पोलीस पथकाने आणि बॉम्ब पथकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्मनुष्य ठिकाणी  पोलीस व्हॅनमध्ये घेऊन रेल्वे मैदानात उभी करुन बॉम्ब पथक स्कॉटच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली.

मात्र सदरील बॅगमध्ये कुठलंही संशयस्पद वस्तू मिळून आलेली नाही. हे रेस्क्यू ऑपरेशन एक तास सुरु होतं.  बॅगबाबत त्या व्यक्तीचा शोध घेतल्या जाईल आणि संबंधितवर कारवाई केली जाईल पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here