मधुमेही विद्यार्थ्यांसाठी रविवारी कार्यक्रम

0

जळगाव – टाईप वन मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रविवार २१ जानेवारी रोजी  सकाळी ८ वाजता गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे टाईप वन डे आऊट हा मनोरंजन व शैक्षणिक कार्यक्रम तसेच कार्बोहायड्रेट काउंटिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.

रोटरी जळगाव गोल्डसिटी, क्लब वन अड्डा व हार्मोकेअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सीएसआर पार्टनर फिनोलेक्स पाईप व मुकुल माधव फाउंडेशन यांचे यासाठी सहकार्य लाभत आहे. निसर्गाच्या सानिध्यात, खुल्या आसमंतात होणाऱ्या या कार्यक्रमात टाईप वन मधुमेही विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी डॉ.अजिंक्य पाटील (77748484032),नीलम विक्रांत(9284050145),भाग्यश्री पाटील(9421547980) यांच्या समवेत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.