आता ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी मोजावे लागणार पैसे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आता ट्विटरवर ब्लू टिक (Twitter Blue Checkmark) घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी ट्विटरवर ब्लू टिक सबक्रिप्शनचा पर्याय देण्यात येणार आहे. ब्लू टिकसाठी प्रतिमहिना 8 डॉलर म्हणजेच 661 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या असणारी ब्लू टिक सिस्टिम दर्जाहीन असल्याचं इलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय. त्यामुळे ब्लू टिक असणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

प्रत्येक देशाच्या क्षमतेनुसार ब्लू टिकच्या किंमती कमी जास्त असतील, असे ट्वीट इलॉन मस्क यांनी केलेय.मस्क यांनी ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी काही खास सुविधा मिळणार असल्याचेही सांगितलं आहे. यामध्ये रिप्लाय, मेन्शन आणि सर्चमध्ये प्राथमिकता मिळेल, जे तुम्हाला स्कॅम आणि स्पॅमपासून दूर ठेवेल. अधिक लांबीचा व्हिडीओ आणि ऑडिओ अपलोड करण्याची सुविधा मिळेल. तसेच अर्ध्याहून अधिक कमी जाहिराती येतील, असे सांगितलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.