Twitter पैसे न भरलेल्या अकाऊंट्सचे ब्लू टिक हटवणार

0

 

ट्विटर (Twitter) आजपासून शुल्क न भरलेल्या व्हेरीफाइड अकाऊंट्सचे ब्लू टिक काढण्यास सुरुवात करणार आहे.

जर तुम्ही अजूनही ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घेतले नसेल तर तुमच्या ट्विटरवरील ब्लू टिक आजपासून हटवली जाणार आहे. भारतात ब्लू टिकसाठी 900 रुपये प्रति महिना मोजावे लागणार आहे. यानुसार, अनपेड ट्विटर अकाऊंटचं ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येणार आहे. एलन मस्ककडून ट्विटरच्या सीईओ पदाची धुरा सांभाळल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले आहे.

ट्विटर ब्लू टिक एक प्रीमियम सर्व्हिस आहे. जी पूर्णपणे पेड आहे. यासाठी मंथली सब्सक्रिप्शन घेणे आवश्यक आहे. ट्विटरचे अँड्रॉयड आणि iOS यूजर्ससाठी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी भारतात 900 रुपये मोजावे लागणार आहे येते. तर वेब यूजर्ससाठी याची किंमत फक्त 650 रुपये आहे. ट्विटर यूजर्स 6 हजार 800 रुपयांचे वार्षिक सब्सक्रिप्शन घेवू शकता.

ब्लू टीक ही फक्त प्रसिद्ध प्रोफाईल असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत होती. यामध्ये राजकीय नेते, समाज कार्यकर्ते, सेलिब्रिटी, शास्त्रज्ञ आदी लोकांचा समावेश होता. एलन मस्ककडून ट्विटरच्या सीईओ पदाची धुरा सांभाळल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आता कोणालाही पैसे देऊन ब्लू टीक घेता येणर आहे. मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून व्हेरीफिकेशन होणार आहे.

शुल्क भरण्याचे फायदे

जर तुम्ही ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घेतले तर तुम्हाला याचे अनेक फायदे होणार आहे. सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्सना ट्विटचे कॅरक्टर लिमिट वढवून देण्यात येणार आहे.

थोडक्यात तुम्हाला 180 शब्दसंख्येचे कॅरक्टर लिमिट असणार नाही.
तसेच सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्सना ट्वीट एडिटचा पर्याय देखील उफलब्ध होणार आहे.
ट्विटर ब्लू सब्सक्रायबरला टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन मिळणार आहे

आता फक्त पेड सबस्क्रिप्शन विकत घेतलेल्या युजर्सनाचं ट्विटरची ब्लू टिक मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी ट्विटरने ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा नवा पर्याय आणला होता. मात्र, त्याआधी ब्लू टिक मिळालेल्या म्हणजे जुन्या व्हेरिफाईट युजर्सची ब्लू टिक हटवण्यात आली नव्हती. आता कंपनीने आधी दिलेल्या ब्लू टिक हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेड सबस्क्रिप्शन नसलेल्यांना ब्लू टिक मिळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.