आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद धरणे आंदोलन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आदिवासी भिल्ल समाजाला न्यायासाठी व मागण्या घेवून बेमुदत घरणे आंदोलनाला सुरू आहे.

वराड बु ता. बोदवड जि. जळगांव येथील जलचक्र तलाव अनेक वर्षांपासून आदिवासी भिल्ल समाजाच्या ताब्यात होता. त्याचा शासनामार्फत लिलाव पध्दतीने ठेका न देता तेथील स्थानिक मासेमारी करणारे आदिवासी बांधवांना नाममात्र फी आकारून मासेमारी करण्यास परवानगी देण्यात यावी.

शिरसोली प्र.न. ता. जि. जळगांव हद्दीतील नेवरे तलाव व शेगजन बाबा तलाव तसेच चमारवडीतील पाझर तलाव, कारखान्या जवळील तलाव हे 35 हेक्टर आतील तलाव लिलाव पध्दतीने टेका न देता स्थानिक आदिवासी भिल्ल समाजाला नाममात्र फी आकारून मासेमारी करण्यास परवानगी देण्यात यावी.

शिरसोली प्र.न. ता. जि. जळगांव येथील रहिवासी दिलीप हरचंद सोनवणे यांच्या मालकीचे प्लॉट नगर भूमापन क्रमांक 487 या मिळकतीवरील सत्ता प्रकार ऐवजी व सत्ता प्रकारावर अर्जदार याचे शर्तभंग नियमाकुल करून देण्याचे प्रस्ताव प्रलंबित आहे. तो तात्काळ आदेश करून देण्याचे प्रस्ताव प्रलंबीत आहेत तो तात्काळ मंजुर करून न्याय देण्यात यावे.

या मागणीसाठी रतन सोनवणे, दिलीप सोनवणे, रामा भिल, राजूभाऊ गायकवाड, मुकेश वाघ, सुभाष मोरे, राजू भिल, सुधाकर सोनवणे इत्यादींसह उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.