चालक मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत असल्यानेच दोन पॅसेंजर ट्रेनची धडक !

0

हैद्राबाद ;- पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहचालक हे अपघात होण्यापूर्वी मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत असल्याने आंध्र प्रदेशमध्ये २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाली होती, या अपघातामध्ये १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अशी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी अपघातासंदर्भात माहिती देताना हा धक्कादायक खुलासा केला. आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई रेल्वे लाईनवर रायगड पॅसेंजर ट्रेनने विशाखापट्टनम पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला, ज्यामध्ये ५० हून अधिक प्रवाशी जखमी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.