नाशिक येथे ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

५५ वर्षीय महिलेवर लैंगिक करणाऱ्या पंचवटीतील २३ वर्षीय नराधमाला पोलिसांनी ८ तासांत अटक केली आहे. या संशयिताला बुधवारी न्यायालयात हजार केले जाणार आहे. अमोज उर्फ टिल्लू अण्णा पवार (रा. नवनाथनगर, पंचवटी) असे संशयित नराधमाचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, घटनेतील ५५ वर्षीय महिला फिर्याद नोंदवित असतानाच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी तपास पथकास सूचना केल्या. त्यानुसार पथकाने मनोज पवाराची माहिती काढत त्याला नवनाथनगर मधून पकडले. घटनेतील पीडित ही रविवारी (ता. ३) रात्री आठ वाजता शेजारीच राहणाऱ्या ओळखीच्या महिलेस ‘जेवण झाले का’ असे विचारण्यास गेली होती. त्याचवेळी ही महिला व तिचा साथीदार टिल्लू हा घरात मद्यपान करत होता.

अतिसेवनाने ही महिला झोपून गेली. त्याचाच फायदा घेत नशेतील टिल्लूने पीडितेस घरात ओढून नेत तिचे तोंड दाबून लैंगिक अत्याचार केले. टिल्लूच्या कृत्यास विरोध तिने केला, मात्र त्याने तिला दमदाटी करून अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी टिल्लू पुन्हा महिलेच्या घरात आला व त्याने धमकावत ‘प्रकरणाची’ वाच्यता केली तर ठार कारेन, अशी धमकी दिली.

मात्र, पीडितने न घाबरता स्थानिकांच्या मदतीने हिंमत करून पंचवटी पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी टिल्लूची हिस्टरी व लोकेशन काढत ताब्यात घेतले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेने गुन्हे शोध पथकाने एपीआय मिथुन परदेशी, एएसआय अशोक काकड, हवालदार अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, पोलिस नाईक जयवंत लोणारे, अंमलदार वैभव परदेशी, कुणाल पचलारे, गोरक्ष साबळे यांनी ही कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.