धक्कादायक; नातेवाईक महिलेने अल्पवयीन मुलावर केला ३ वर्ष अत्याचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशभरात अनेक अल्पवयीन मुलींवर महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना रोज घडत असून, एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. चक्क एका अल्पवयीन मुलासोबत त्याच्याच नात्यातील महिलेने गोड बोलून त्याच्या सोबत जे केले ते धक्कादायक आहे.

सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलासोबत तीन वर्षांपासून नातेवाईक महिलेले गोड बोलून त्याला फसवून घेऊन गेली. यानंतर तीन वर्षांपासून त्याचा शोषण करून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होती. हि घटना ज्यावेळेस अल्पवयीन मुलाच्या परिवाराला समजली तेव्हा याबाबत परिवाराने पोलिसात तक्रार दाखल केली खरी, त्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला तिच्या तावडीतून सोडवले सुद्धा, पण तिच्यावर गुन्हा दाखल करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही.

महिलेच्या कचाट्यातून अल्पवयीन मुलाची जरी सुटका करण्यात आली असली तरी, त्याला अजूनही खऱ्या अर्थाने मुक्तता मिळाली नाही. कारण महिला त्या मुलावर सतत शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव टाकत होती. जर त्याने असे नाही केले, तर त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत असत. पीडित परिवार पुन्हा पोलिसात गेले असता, त्यांना कुठलाही दिसला मिळाला नाही. अखेर परिवाराने न्यायालयात धाव घेत नायायाची मागणी केली आहे. कोर्टाने या प्रकरणी चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.