डोंगरातील झरा पाहण्याचा मोह जीवावर बेतला..!

पाण्याचा अंदाज न आल्याने संपूर्ण परिवार गेला वाहून : क्षणात होत्याचे नव्हते

0

 

पुणे

पावसाचा आनंद घेणे सर्वांनाच आवडत असते. वाहणाऱ्या धबधब्याचे सर्वांमध्ये मोठे आकर्षण असते, मात्र हे आकर्षण बऱ्याचदा घातक ठरू शकते याची जाणीव नागरिकांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. लोणावळा येथे भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील झरा पाण्यासाठी गेलेल्या कुटुंबाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

विशेष म्हणजे या परिवारात चार दिवसांपूर्वीच लग्न समारंभ पार पडल्याने आनंदाचे वातावरण होते. त्या काळात आलेला थकवा घालवण्यासाठी लोणावळा जाऊन आनंद घेण्याचा त्यांचा विचार होता. मात्र या आनंदावर काळाने झाला घातला आणि संपूर्ण आनंदाचे रूपांतरण कटू दुःखात झाले. या अपघातात कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यातील एका मृतदेहाचा शोध घेण्याचे काम अद्यापही सुरूच आहे.

 

आनंद घेण्यासाठी आला होता अन्सारी परिवार..

 

यंदाच्या झालेल्या जोरदार पावसाने लोणावळा येथील भूशी डॅम पहिल्यांदाच ओव्हर फ्लो झाला आहे. रविवारी सुट्टी निमित्त पर्यंटकांची मोठी गर्दी वाढलेली आहे. यातील पायऱ्यांवर झोपून पर्यंटक धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेत आहेत. येथील भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल पाहण्यासाठी अन्सारी कुटुंब गेले होते. त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते संपूर्ण कुटुंब डोळ्यांदेखत वाहून गेल्याची घटना घडली. या कुटुंबाचा बचाव पथकाने घेतला असताना चार मृतदेह सापडले आहेत. यातील एकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

 

चार दिवसांपूर्वी परिवारात होता विवाह

पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच या कुटुंबाकडे लग्न होते. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी लोणावळ्यात जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे २७ जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम २९ तारखेला झाला.

 

क्षणात झाले होत्याचे नव्हते

लग्नाचा थकवा घालवण्यासाठी ३० तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच ते एका टेम्पो ट्रॅव्हलने निघाले. लोणावळ्यात १२ वाजता पोहचले. एकूण १७ जण लोणावळ्यात आले होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. भुशी डॅम्पच्या ठिकाणी वर्षाविहारचा आनंद ते घेत होते. आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पाण्याचा आई खोलीचा अंदाज न आल्याने संपूर्ण परिवार डोळ्यांसमोर वाहून गेला. अन एका दिवसात घरातील आनंदाच्या वातावरणाचा रुपांतर दु:खात झाले. कुटुंबातील पाच जण सर्वांना सोडून गेले.

 

हे सदस्य गेले वाहून

साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36)

अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13)

मारिया अन्सारी (वय- 9)

उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8)

अदनान अन्सारी (वय- 4)

येवेळी  जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, प्रांत सुरेंद्र नवले, नायब तहसीलदार गणेश तळेकर, लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.