धक्कादायक ! साईबाबांच्या शिर्डीवर अतिरेक्यांचा डोळा

0

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिर्डीवर अतिरेकी कट रचला जाण्याच्या इराद्यानं रेकी केल्याची धक्कादायक कबुली अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी दिली आहे. दुबईत अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांनी दिलेल्या या कबुलीनं एकच खळबळ उडाली आहे.

गुजरात एटीएसने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेची संबंधित असलेल्या अतिरेक्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यानंतर आता असंख्य लोकांना श्रद्धास्थान असलेल्या साईनगरी शिर्डीवर दहशतवाद्यांचा डोळा होता, ही बाबही समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या अतिरेक्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे. ज्या दहशतवादी संघटनेशी हे अतिरेकी संबंधित आहे, ती संघटना पाकिस्तानातील असल्याची माहिती गुजरात एटीएसनं दिली आहे.

फक्त शिर्डीतच नव्हे तर एका हिंदी वाहिनीच्या संपादकाच्या घराची आणि कार्यालयाचीही रेकी या अतिरेक्यांनी केली असल्याचं तपासासून समोर आलं असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. गुजरात एटीएसनं या दहशतवाद्यांकडन अवैध शस्त्र आणि स्फोटकं जप्त केली असल्याचं सांगितलं जातंय. याआधीही अनेकदा शिर्डी संस्थानला धमकीचे फोन आणि मेल आल्याचं पाहिलं देलं आहे. अशातच आता समोर आलेल्या माहितीनंतर मंदिर प्रशासनानं सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केली आहे.

गुजरात एटीएसने केले अटक

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने काही अतिरेक्यांना अटक केली होती. दुबईतून या अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्याकडून शिर्डी येथील मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्ली येथे वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी न्यूज चॅनेलचे संपादक यांच्या दिल्ली येथील सुदर्शन टिव्हीचे कार्यालय आणि शिर्डी येथील त्यांच्या घरी रेकी केल्याची कबुली दिली आहे.

सुरक्षेत वाढ

या घटनेनंतर शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे. दुबई येथील अटक केलेल्या आरोपी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी सुरेश चव्हाणके यांच्या मुळगाव शिर्डी येथील घराची रेकी केली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. .

या जिहादी अतिरेक्यांकडे अवैध हत्यारं, विस्फोटकं तसेच गोळाबारुद आढळून आलं आहे. गुजरात एटीएसनं केलेल्या दाव्यानुसार, अटक करण्यात आलेल्यांचं पाकिस्तान दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं सांगितलं जातंय. आता अटक करण्यात आलेल्या सगळ्यांची कसून चौकशी केली जाते आहे. या खळबळजनक कबुलीनंतर आता शिर्डीतील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

शिर्डीत खळबळ

याप्रकरणी अद्यापपर्यंत सहा मौलवीसह दोघांना, अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. सर्व आठ जणांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीसारख्या अती संवेदनशील ठिकाणी दहशतवादी संघटनेचे लोक येऊन रेकी करून जातात, पण याबाबत पोलीस यंत्रणेला काहीच कळत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.