सुष्मिताला छक्का म्हणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुष्मिता सेन (Sushmita Sen) सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. सुष्मिता सेन लवकरच तिच्या आगामी ‘ताली’ (Taali) या वेबसिरीजमधुन सर्व चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळ्या दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी वेबसिरीजच दिग्दर्शन केले आहे.

सुष्मिता सेन या वेबसिरीजमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत (Gauri Sawant) यांची भुमिका साकारत असून सुष्मिता सेन हिला प्रचंड ट्रॉलिंगचा सामना करावा लागत आहे. पण, सुष्मिता सेनने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे.

वारंवार छक्का म्हंटले जाते
‘ताली’ या वेबसिरीजमध्ये सुष्मिता सेन ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या श्री गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरचा पहिला लूक शेअर केल्यावर तिचा अर्धा चेहरा आणि टाळ्या वाजवतांना ती आपल्याला बघायला मिळाली होती. कमेंट मध्ये बऱ्याच लोक ‘पुन्हा पुन्हा छक्का’ लिहीत होते. मी विचार केला, ते माझ्या सोबत असं कस करू शकतात? मी वयक्तिकरित्या ते बोलणे मनावर घेतले. कारण ते माझ्या टाईमलाईनवर वारंवार येत होत.

मी फक्त गौरी सावंतची भुमिका साकारतेय
सुष्मिता सेन पुढे म्हणाली, “कमेंटमध्ये वारंवार वाईट बोलणाऱ्या त्या सर्वांना ब्लॉक केले आहे, परंतु अशी माणसं जेव्हा टिका करतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं की, मी तर फक्त गौरी सावंतची फक्त भुमिका साकारत आहे. परंतु गौरी तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ह्या लोकांबरोबर जगत असते.”

Leave A Reply

Your email address will not be published.